'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य पूजारी नेमले

शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (12:30 IST)
उत्तर कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील गदग येथे लिंगायत धर्माने धर्म परंपरेला छेद देत सर्वधर्म समभाव दाखवला आहे. येथील मठाने एका मु्स्लिम युवकाला आपला मुख्य पूजारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या तरूणाचे नाव दीवान शरीफ रहमानसाब मुल्ला (व३३) असे आहे. मुल्ला यांची २६ फेब्रुवारीला विधीवत आसुती गावातील मुरुगराजेंद्र कोरानेश्वरा शांतीधाम मठामध्ये पुजारीपदी नियुक्त करण्यात येणार आहे. 
 
यावेळी बोलताना १२ व्या शतकात होऊन गेलेले समाज सुधारक बसवन्ना यांच्या विचारांचा आपल्यावर फार मोठा प्रभाव आहे. बसवन्ना यांच्या विचारांनी आणि शिकवणींनी प्रभाव टाकल्याचे दीवान शरीफ रहमानसाब मुल्ला यांनी सांगितले. तसेच बसवन्ना यांच्या सामाजिक न्याय आणि सदभावनेच्या विचारांनीच आपण काम करु, असेही मुल्ला यांनी म्हटले आहे. 
 
आसुती गावात मुरुगराजेंद्र कोरानेश्वरा शांतीधाम मठ आहे. तसेच हा ३५० वर्षापूर्वीच्या कोरानेश्वर संस्थेच्या मठाशी जोडलेला आहे. तर शरीफ यांचे पिता स्वर्गीय रहिमनसब मुल्ला हे शिवयोगीच्या प्रवचनांनी प्रभावित झाले होते. त्यांनी आसुती गावात मठ स्थापन करण्यासाठी दोन एकर जागा दिली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती