वारिस पठाण यांना कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस

शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (10:09 IST)
एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांना कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये पठाण यांना 29 फेब्रुवारी रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कलबुर्गीचे पोलीस आयुक्त एम. एन. नागराज यांनी याबाबत माहिती दिली आहे.
 
आम्ही 15 कोटी असलो तरी 100 वर भारी आहोत असं म्हणत वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांबाबत भाष्य केलं होतं. कर्नाटकातील गुलबर्गा इथल्या सभेत वारिस पठाण यांनी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याप्रकरणी कलबुर्गी पोलिसांनी वारिस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा कलम 117,153 (प्रक्षोभक भाषण) आणि कलम 153 ए (समाजात तेढ निर्माण करणे) अंतर्गत दाखल करण्यात आला होता. त्यानंतर  पोलिसांनी पठाण यांना नोटीस बजावली आहे .

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती