कैलाश विजयवर्गीय पुत्र MLA आकाश यांनी निगम अधिकार्‍याला बॅटने मारले (व्हिडिओ)

इंदूर- भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि मध्य प्रदेशाचे माजी मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या विधायक पुत्र आकाश विजयवर्गीय यांनी बुधवारी एका निगम अधिकार्‍यला बॅटने मारहाण केली.
 
निगम कर्मचारी आकाश यांच्या विधानसभा क्षेत्रात स्थित गंजी कंपाउंड येथील एक जुनाट घर तोडण्यासाठी पोहचले होते. या दरम्यान आकाश तेथे आपल्या समर्थकांसह पोहचले आणि एका अधिकार्‍यावर बॅटने वार केला.
 
आमदार घर तोडण्याची कारवाई थांबवण्यासाठी निगम अधिकार्‍यांवर दबाव टाकत होते. आकाश यांच्या समर्थकांनी निगम कर्मचार्‍यांसोबत दुर्व्यवहार केल्याचं सांगण्यात येत आहे. काही वाहनांदेखील नुकसान झाले आहे.
 
या दरम्यान, तीन पोलीस ठाण्यांचे बळ आणि सीएसपी घटनास्थळी पोहचले. काँग्रेस नेते माणक अग्रवाल यांनी म्हटले की ही भाजप आमदार आणि कार्यकर्त्यांची गुंडगिरी आहे. आकाश यांच्याविरुद्ध प्रकरण दाखल केले गेले पाहिजे.
 
दुसरीकडे भाजप नेते हितेश वाजपेयी यांनी आमदार आकाश यांचा बचाव करत अधिकार्‍यांच्या कारवाईवर प्रश्न केला आहे. त्यांच्याप्रमाणे निगमकर्मी नियम पाळत नाही.
 
निगम कर्मचारी स्ट्राइकवर
या घटनेच्या विरोधात नगर निगम कर्मचारी नेते उमाकांत काले यांच्या नेतृत्वाखाली कर्मचार्‍यांनी सर्व विभागांमध्ये काम बंद केले आहेत. कर्मचारी आमदार आकाश विजयवर्गीय द्वारा निगम अधिकार्‍यासोबत केलेल्या दुर्व्यवहार विरोधात संपावर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती