इंडिगो एयरलाईन्स ला मोठा तोटा, लॉक डाऊन मुळे रद्द झालेल्या तिकिटाचे पैसे परत केले

बुधवार, 24 मार्च 2021 (22:04 IST)
मागच्या वर्षी मार्चच्या महिन्यात कोरोनाच्या साथीच्या रोगामुळे लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे अचानक विमानसेवा बंद करण्यात आली होती. अशा परिस्थितीत अनेक प्रवाश्यांनी पूर्वीपासून बुक केलेली तिकिटे रद्द केली आणि प्रवाश्यांचे भाड्याचे पैसे अडकले होते. आता हळू‑हळू सर्व विमान कंपन्यांनी हे पैसे प्रवाशांना परत करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, इंडिगोने बुधवारी जाहीर केले की वर्ष 2020 मध्ये अचानकपणे रद्द करण्यात आलेल्या विमानसेवेमुळे रद्द केलेल्या सर्व तिकिटाचे सुमारे 99.5%  टक्के रकम त्यांनी परत केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यामुळे उड्डाण न करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या रद्द केलेल्या तिकिटांचे पूर्ण पैसे देण्यात येणार होते.  
देशातील सर्वातमोठी कंपनी इंडिगो ने सांगितले आहे,की मे 2020 पासून कार्य पुन्हा सुरु केल्यापासून कंपनी द्रुतगतीने ग्राहकांना त्यांची थकबाकी परत देत आहे. 
एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, “विमान कंपनीने प्रवाशांना सुमारे 1,030 कोटी रुपये परत केले आहेत, जे एकूण रकमेच्या सुमारे 99.95% आहे. परतावा संबंधित प्रलंबित प्रकरणे बहुतांश रोख व्यवहाराची आहेत ज्यात इंडिगो ग्राहकांच्या बँक ट्रान्सफरच्या तपशिलाची प्रतीक्षा करीत आहे.
आम्ही त्यापैकी 99.95%टक्के ग्राहकांचे पैसे  परत केले आहे.   आणि उर्वरित ग्राहकांकडून आवश्यक तपशील मिळाल्यावर  उर्वरित भुगतान देखील करण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती