बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी आज सुनावणी

शुक्रवार, 10 मे 2019 (10:09 IST)
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी आज अर्थात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी पाच सदस्यीय खंडपीठासमोर होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
 
पाच सदस्यीय खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगाई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वादावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मध्यस्थ नेमण्यावर सर्वोच्च न्यायालयाने ८ मार्च रोजी शिक्कामोर्तब केले होते. अयोध्या प्रकरणी मध्यस्थीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. निवृत्त माजी न्यायमूर्ती एफ. एम. आय. खलीफुल्ला हे या समितीचे अध्यक्ष असून त्यात अध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती