हाफिज सईदच्या फाऊंडेशनवरची बंदी उठवली

शनिवार, 27 ऑक्टोबर 2018 (10:08 IST)
पाकिस्तानात इम्रान खान सरकारने मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या ‘जमात-उद-दवा’आणि ‘फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन’वरील बंदी उठवली. याआधी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी अध्यादेश जारी करून हाफिजच्या संघटनांवर बंदी आणून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. हुसैन यांनी अध्यादेश काढून संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या काळय़ा यादीतील हाफिज सईदच्या ‘जमात-उद-दवा’आणि ‘फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन’वर बंदी घातली होती.
 
जमात-उद-दवावरील बंदीच्या अध्यादेशावर विद्यमान सरकारने कारवाई केलेली नाही त्याचा संदर्भ देत हाफिज सईदने इस्लामाबाद कोर्टात याचिका दाखल केली होती. पाकिस्तानातील तहरीक-ए-इन्साफ सरकारने या अध्यादेशावर कारवाई केली नाही, त्याची अंमलबजावणी केली नसल्यामुळे हा अध्यादेश अवैध असल्याचे हाफिजचे वकील रिजवान अब्बासी आणि सोहेल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती