नवा खुलासा : परीक्षा टाळण्यासाठी प्रद्युम्नची हत्या

गुरूवार, 9 नोव्हेंबर 2017 (10:16 IST)

हरियाणाच्या गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणी परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्याने प्रद्युम्न ठाकूरची हत्या केली, खळबळजनक माहिती सीबीआयने दिली आहे. याशिवाय  हत्येपूर्वी प्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं स्पष्टीकरणही सीबआयने दिलं आहे.

सीबीआयने शाळेतीलच मंगळवारी अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अटक केली आहे.   तर बस कंडक्टर अशोर कुमारला यापूर्वीच सीबीआयच्या कैदेत आहे.

परीक्षा आणि पालक-शिक्षिक मीटिंग टाळण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्याने प्रद्युम्नची हत्या केली. पहिल्यांदा त्याने हत्यार खरेदी केलं आणि नंतर हत्या केली. मात्र सीबीआयने कंडक्टर अशोक कुमारला क्लीट चिट दिलेली नाही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती