कॉंग्रेसच्या पाच मोठ्या नेत्यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा

सोमवार, 13 जुलै 2020 (17:02 IST)
कॉंग्रेसचे पाच मोठ्या नेत्यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल, पी. चिदंबरम आणि अहमद पटेल यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली आहे. सचिन पायलट यांना जयपूरला जाण्यास सांगण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे गृह आणि वित्त विभागासारखे महत्त्वाचे विभाग आपल्या समर्थक मंत्र्यांना देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडेच ठेवण्याची अटही व्यक्त केली आहे.
 
मध्य प्रदेशातील सत्ता गेल्यानंतर राजस्थानमधील काँग्रेसच्या सरकारवर अस्थिरतेचे संकट घोंगावू लागलं आहे. घोडेबाजाराच्या प्रकरणात नोटीस आल्यानंतर नाराज झालेले काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे दिल्लीत असून, काँग्रेसकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांच्या कार्यालये व निवासस्थानावर आयकर विभागानी धाडी टाकल्या आहेत. गेहलोत यांनी १०२ आमदारांचा दावा केला आहे, यावर सचिन पायलट यांनी हा दावा खोटा असल्याचं म्हणत माझ्यासोबत २५ आमदार बसले आहेत असा दावा आता सचिन पायलट यांनी केला आहे. हा वाद मिटवण्यासाठी प्रियंका गांधीं मैदानात उतरल्या आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती