बाहेरुन घेतलेले पदार्थ मल्टिप्लेक्समध्ये नेता येणार

शुक्रवार, 13 जुलै 2018 (15:20 IST)
मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे पदार्थ नेणाऱ्यांना कोणीही अडवू शकत नाही, तसा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे यापुढे मल्टिप्लेक्समधील महागडे पदार्थ घेण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात दिली. मुंडे यांनी आलक्षवेधीच्या माध्यमातून मल्टिप्लेक्स, महामार्गावरील फुडमॉल व मॉलमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यास घालण्यात येणारी बंदी आणि आतील खाद्यपदार्थांची जादा दराने होणारी विक्री याकडे सरकारचे लक्ष वेधले होतं. 
 
त्याचबरोबर पाण्याची बॉटल किंवा अन्य खाद्यपदार्थ यांचे दर मल्टिप्लेक्स, मॉलमध्ये वेगळे आणि बाहेर वेगळे का? असा प्रश्न मुंडेंनी विचारला. त्यावर केंद्र सरकारनं केलेल्या कायद्याप्रमाणे 1 ऑगस्टपासून एकाच वस्तूची किंमत सगळीकडे सारखी असेल, असं  राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती