अरविंद केजरीवाल यांना ईडीचे आठवे समन्स

मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (15:40 IST)
दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणात अमलबजावणी संचालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले असून हे आठवे समन्स आहे. त्यांना 4 मार्च रोजी मद्य धोरण संदर्भात चौकशीसाठी बोलावले असून यापूर्वी देखील त्यांना सात वेळा समन्स पाठवले आहे. 

या वर केजरीवाल म्हणाले की हे प्रकरण अद्याप न्यायालयात आहे. पुढील सुनावणी 16 मार्च रोजी आहे. तरीही ईडी समन्स पाठवत आहे.ईडी ने दररोज समन्स पाठ्वण्याऐवजी न्यायालयातील निर्णयाची वाट बघावी. 

आप ने हे समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले नाही. केजरीवाल यांना  समन्स पाठवून देखील त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ईडी ने न्यायालयात याचिका दाखल केली. या वर दिल्ली न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना 16 मार्चला न्यायालयात राहण्याचे निर्देश दिले असून ईडी ने  पुन्हा 8 वे समन्स पाठवून केजरीवाल यांना  ईडीच्या कार्यालयात हजर होण्यास सांगितले. आम आदमी पार्टीने म्हटले आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहणार नाहीत. पक्षाने म्हटले आहे की एजन्सीने वारंवार समन्स जारी करण्याऐवजी न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करावी.

Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती