5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर

शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (17:39 IST)
निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पश्चिम बंगालमधल्या 294 जागांसाठी, तमिळनाडूतल्या 234 जागांसाठी, केरळातल्या 140, आसाममधल्या 126 तर केंद्रशासित पुदुच्चेरीतल्या 30 जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण 824 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. 18.68 कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. 2.7 लाख मतदान केंद्र असणार आहेत” अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली.
 
आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. 27  मार्चपासून मतदानाला सुरुवात होईल. मतमोजणी 2 मे रोजी होणार. केरळ, तमिळनाडूत आणि पुदुच्चेरीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 6 एप्रिलला मतदान होईल आणि 2 मे रोजी मतमोजणी आणि निकाल लागेल. आसामची निवडणूक 3 टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचं मतदान 27 मार्चला होईल. दुसऱ्या टप्याचे मतदान 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिलला होईल.
 
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये एका फेजमध्ये निवडणूक होईल. अधिसूचना जारी होण्याची तारीख 12 मार्च, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 19 मार्च, उमेदवारी अर्जाची छाननी 20 मार्च, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 22 मार्च तर मतमोजणी 2 मे रोजी होणार. 
 
तामिळनाडूत विधानसभेच्या 234 जागांसाठी एका फेजमध्ये मतदान होईल. अधिसूचना जारी होण्याची तारीख 12 मार्च, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 19 मार्च, उमेदवारी अर्जाची छाननी 20 मार्च, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 22 मार्च, तर मतमोजणी 2 मे रोजी होणार. 
 
केरळमध्ये मतदान 6 एप्रिल रोजी होणार असून अधिसूचना जारी होण्याची तारीख 12 मार्च, उमेदवारी अर्जाची छाननी 20 मार्च, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 22 मार्च, केरळमध्ये मतदान मतमोजणी 2 मे रोजी होणार. 
 
बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान
पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक टप्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 01 एप्रिल, तिसरा टप्पा 06 एप्रिल आणि चौथा टप्पा 10 एप्रिलला होईल. पाचवा टप्पा मतदान 17 एप्रिल, सहावा 22 एप्रिल, सातवा 26 एप्रिल, आठवा टप्पा 29 एप्रिलला होईल. त्यानंतर 2 मे रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती