Earthquake: दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, तीव्रता 5.8 होती

शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (22:05 IST)
Earthquake in Delhi-NCR: शनिवारी रात्री 9.34 च्या सुमारास दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.8 इतकी मोजली गेली. भूकंपाच्या धक्क्याने घाबरलेले लोक घराबाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचले. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानचा हिंदुकुश प्रदेश होता. 
 
भूकंपाचे धक्के केवळ दिल्ली-एनसीआरच्या आसपासच्या भागातच नव्हे तर जम्मू-काश्मीर, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या काही भागातही जाणवले. मात्र, आतापर्यंत कुठूनही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. 
 
5.8 रिश्टर स्केलचा भूकंप हा मध्यम तीव्रतेचा भूकंप मानला जातो. मात्र, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पाहायला मिळाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये होता. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्येही त्याचे धक्के जाणवले आहेत. केंद्र हिंदुकुशमध्ये असल्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारत या तिन्ही देशांना याचे धक्के जाणवले आहेत.म्मू-काश्मीरमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत, तर दिल्ली-एनसीआरही भूकंपाच्या धक्क्यांमुळे सतत हादरत आहे.  
 
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती