दिल्लीकरांना दिवाळी भोवली, प्रदूषण पातळीत मोठी वाढ, शाळांना सुट्टी

सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (10:19 IST)
दिल्लीमध्ये प्रदूषणाच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे. दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी दवही पडले आहेत. याकडे पाहाता दिल्लीतील सुमारे 1700 शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यामुळे दिल्लीकरांना दिवाळी चांगलीच भोवली असे म्हणावे लागेल. 
 
दिल्लीत वेगवेगळ्या शाळांमध्ये सुमारे दहा लाख विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत. यात जास्तीत जास्त शाळा सकाळच्या वेळेत भरतात. सकाळच्या वेळेत दवचा धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोबतच विद्यार्थ्यांना मास्क लावण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा