काँग्रेसने दंगल घडवणार्‍यांना मुख्यमंत्री बनवले

शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (12:11 IST)
मोदींची कमलनाथांवर नाव न घेता टीका
काँग्रेसने दंगलीचा आरोप असलेल्या लोकांना मुख्यमंत्री बनवले आहे. काँग्रेसमध्ये आतापर्यंत फक्त एका कुटुंबाचेच गुणगान झाले. आता ते वंदे मातर्‌म आणि भारत मातेला विरोध करत आहेत. पंजाबमधल्या गुरदासपूरमध्ये त्यांनी एका रॅलीला संबोधित केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
 
मोदींनी 1984 च्या शीख दंगलीचा उल्लेख करत सांगितले की, एका कुटुंबाच्या इशार्‍याने ज्या ज्या आरोपींना सज्जन  सांगून फायली बंद करण्यात आल्या, एनडीए सरकारने सत्तेवर आल्यानंतर त्या सर्व फायली बाहेर काढल्या, या प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही एसआयटी स्थापन केली असून त्याचा परिणाही समोर आला आहे.
 
देशाचे विभाजन होत असताना काँग्रेसच्या निष्काळजीपणामुळेच करतारपूर साहिब पाकिस्तानात गेले.  
 
काँग्रेसच्या निष्क्रियतेमुळेच 70 वर्षांपासून भाविकांना दुर्बिणीने करतारपूर साहिबचे दर्शन घ्यावे लागत आहे. गुरुदासपूरची जमीन ही देश, समाज, मानवतेसाठी एक प्रेरणादायी राहिली आहे.
 
2022 मध्ये न्यू इंडियाच्या माध्यमातून सव्वा कोटी देशवासीयांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी येथूनच प्रेरणा मिळाली  आहे. काँग्रेसचा इतिहास शीख भाऊ-बहिणींचा हत्या करणारा असून, त्यांनी देशात दंगली घडवणार्‍या आरोपींना मुख्यमंत्रिपदी बसवले. त्यांच्यापासून पंजाबसह देशवासीयांनी सुरक्षित राहण्याची गरज आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती