गांधीजींच्या हत्येचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला ?

महात्मा गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला तर सर्वाधिक नुकसान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) झाल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले. महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेचे संघाशी संबंध असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले. मी देशातील नागरिकांना आणि माध्यमांना विचारू इच्छिते की, गांधीजींच्या हत्येचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला ?. आम्ही तुरूंगात गेलो, आमच्यावर बंदी लादण्यात आली आणि आजही आम्ही त्रास सहन करत आहोत. 
 
देशाला त्रास भोगावा लागला. संघ आणि जनसंघालाही यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, असे त्यांनी म्हटले.
 
महात्मा गांधींच्या हत्येचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला झाला. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे विसर्जन करून नवीन राजकीय संघटना उभी केली पाहिजे, अशी घोषणा गांधीजींनी केली होती, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती