चंपाई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (13:06 IST)
चंपाई सोरेन यांनी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्याशिवाय दोन आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आलमगीर आलम (काँग्रेस) आणि सत्यानंद भोक्ता (आरजेडी) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने हेमंत सोरेन यांची याचिका फेटाळून लावली. 
 
शपथ घेतल्यानंतर चंपाई सोरेनना 10 दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागेल. चंपाई सोरेन यांच्यासोबत काँग्रेस आणि आरजेडी कोट्यातील प्रत्येकी एक मंत्रीही शपथ घेणार आहे.
चंपाई सोरेन सरकार 5 फेब्रुवारीला विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहे. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
 
हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यांनी प्रथम उच्च न्यायालयासमोर आपली बाजू मांडावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती