वोटिंगसाठी मुंबईत फिल्म स्टार्स जोशात, सचिन तेंडुलकरने कुटंबासह केले मतदान

सोमवार, 29 एप्रिल 2019 (14:22 IST)
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये चौथ्या चरणासाठी 9 राज्यांच्या 72 जागांवर मतदान सुरू आहे. यात मुंबईच्या 6 सीट्सवर देखील मतदान होत आहे. जिथे अनेक बॉलीवूड स्टार्सने मतदान केले.
सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली आणि मुलांसह मतदान केले.
बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या आई मधु चोप्रासह वोटिंगसाठी पोहचली. वोटिंगनंतर प्रियंकाने फोटो शेअर करत मतदान किती आवश्यक आहे लिहिले.
वरुण धवनने देखील मताधिकाराचा प्रयोग केला. सोशल मीडियावर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, BE COOL GO VOTE.
बॉलीवूडची बिंदास नायिका कंगना रनौट देखील मतदानासाठी पोहचली होती.
सोनू सूद ने मत दिल्यावर आपले बोट दाखवले.
मुंबई नार्थहून काँग्रेसची लोकसभा उमेदवार उर्मिला मातोंडकरने देखील बांद्रामध्ये मतदान केले.
बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालने मतदान केल्यानंतर सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली.
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने जुहू स्थित पोलिंग बूथवर मतदान केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती