जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही भारतीयास जमीन खरेदी करता येणार मोदी सरकारचा मोठा निर्णय

बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (16:56 IST)
मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णानुसार आता देशातील कोणतीही व्यक्ती जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन खरेदी करू शकते व तिथेच वास्तव्देखील करू शकते. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. तर शेतीसाठीच्या जमिनीबाबत स्थगिती कायम असणार आहे.
 
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा याबाबत माहिती देताना म्हणाले की, बाहेरचे उद्योग जम्मू-काश्मीरमध्ये यावेत अशी आमची इच्छा आहे. यासाठी औद्योगिक जमिनीत गुंतवणुकीची आवश्कता आहे.
 
मात्र, शेतजमिनी केवळ राज्यातील लोकांकडेच राहतील. याअगोदर जम्मू-काश्मीरमध्ये केवळ स्थानिक लोकच जमिनी खरेदी- विक्री करू शकत होते. मात्र, मोदी सरकारच्या या नव्या निर्णयानुसार आता राज्याबाहेर लोकांना देखील या ठिकाणी जमीन खरेदी करता येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती