महिलांना लोकलमधून त्यांच्यासोबत लहान मुलांना प्रवासाची परवानगी नाही

शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (16:08 IST)
राज्य सरकारने मुंबईच्या लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची मूभा दिली होती. पण अनेक महिला आपल्या लहान मुलांसोबत प्रवास करत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधून महिलांना प्रवास करता येईल, त्यांच्यासोबत लहान मुलांना प्रवासाची परवानगी नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. 
 
मुंबई लोकलमध्ये महिला प्रवासी लहानमुलांना सोबत घेऊन आल्या तर त्यांना प्रवासाला परवानगी देण्यात येणार नाही, असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. यानुसार आता मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकावर आरसीएफ जवान तैनात असणार आहे. महिला प्रवाशासोबत लहान मुल आढळून आलं, तर त्या महिलेला प्रवासाची परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती