कोरोनाबाधित रुग्ण सर्रास घराबाहेर फिरताना आढळला, गुन्हा दाखल

सोमवार, 1 मार्च 2021 (16:00 IST)
मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण कोरोनाचे नियम सर्रासपणे टाळताना दिसत आहे. चेंबुरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक कोरोनाबाधित रुग्ण सर्रास घराबाहेर फिरताना आढळला.
 
कोरोना पॉझिटिव्ह असतानाही घराबाहेर फिरणाऱ्या चेंबूरमधील एका रूग्णावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूरच्या अतुर पार्क या उच्चभ्रू परिसरात हा रुग्ण पत्नी आणि मुलीसह राहतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या मुलीला करोनाची लागण झाली होती. लागण झालेला व्यक्ती बाहेर फिरत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांना मिळाली. संबंधिताविरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रात दाखल केली.
 
मुंबईत  विनामास्क लोकल प्रवास करणा-या प्रवाशांवर पालिका आणि रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे. १ ते २७ फेब्रुवारीदरम्यान तब्बल ७ हजार ८०० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती