श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द

शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (16:55 IST)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचे विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महापुरुषाचा अवमान केल्याप्रकरणी नगरविकास विभागाने छिंदमवर ही कारवाई केली.
 
छिंदमविरोधात कारवाई करण्यासंदर्भात नगरविकास विभागाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीवर सुनावणी होणार होती. या सुनावणीला छिंदमला उपस्थित राहून आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. मात्र छिंदमने गैरहजेरी लावली. त्याला सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते तो आजही अनुपस्थित राहिल्याने  मुदतवाढ न देता किंवा त्याची वाट न पाहता नगरविकास विभागाने कारवाई करत निकाल दिला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती