मग त्याने थेट प्रेयसीला भेटण्यासाठी कोरोनाची मदत घेतली

गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (15:49 IST)
नवी मुंबईतील एका पतीनं प्रेयसीच्या भेटीसाठी कोरोनाची मदत घेतली. त्या २८ वर्षीय व्यक्तीने कोरोना झाल्याचे पत्नीला खोटे सांगून थेट प्रेयसीचे घर गाठले. तळोजा येथे राहणाऱ्या या व्यक्तीने प्रेयसीच्या भेटीसाठी इंदोरपर्यंत प्रवास केला. 
 
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण मरणार आहोत, असं त्या व्यक्तीनं सांगितलं होतं. त्यानंतर त्यानं आपला मोबाईल बंद केला. दुसऱ्या दिवशी त्याच्या मेहुण्याला वाशी परिसरातील एका गल्लीत त्यांची बाईक सापडली. बाईकजवळ त्याला गाडीची चावी हेल्मेट, आणि पाकिट सापडलं. त्यानंतर त्याच्या नातेवाईकाने हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. 
 
पोलिसांकडून त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली. पोलिसांनी कोरोना चाचणी करण्यात आलेल्या विविध कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन त्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यानंतर  गेल्या आठवड्यात पोलीस अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीचे इंदोर येथे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक इंदूर येथे पोहोचले असता, ती व्यक्ती ओळख बदलून भाड्याने जागा घेवून राहत असल्याचे आढळले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती