ईडीने विहंग सरनाईक यांना घेतले ताब्यात

मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (16:20 IST)
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घऱी सकाळी ईडीचं पथक दाखल झाले. मुंबई तसंच ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी ईडीकडून शोधमोहीम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचं पथक दाखल झालं होतं. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं आहे.  
 
टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती