मुंबईत प्रायव्हेट लॅबवर चार आठवडयांसाठी करोना चाचण्या करण्यास बंदी

शुक्रवार, 12 जून 2020 (11:31 IST)
मुंबईतील सर्वात मोठया खासगी प्रयोगशाळेवर करोना व्हायरसच्या चाचण्या करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. प्रयोगशाळेकडून करोना चाचणीचे रिपोर्ट उशिराने मिळत असल्याने महापालिकेने पुढच्या चार आठवडयांसाठी बंदीची कारवाई केली आहे.
 
सध्याच्या घडीला मुंबई देशातील करोना व्हायरसचे हॉटस्पॉट बनले आहे. अशात चाचण्यांचा वेग मंदावेल असे देखील चित्र समोर येत आहे परंतू रिपोर्ट उशिरा येत असल्यामुळे उपचाराला विलंब होत असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कठिण होत असल्याचे सांगितले जात आहे. 
 
मीडिया रिपोर्टप्रमाणे उशिर होण्यामागे तेथील कर्मचार्‍यांदेखील करोनाची लागण झाल्याचे सांगितले. तसेच रिपोर्टना विलंब होण्याचे प्रमाण खूप कमी असल्याचे देखील सांगण्यात आले.
 
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३६०७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १५२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती