मातृदिन विशेष : माय

पहाटे मायेचं माझ्या
फिरत होत जातं
ओठावरल्या ओव्यांनी तिची
फुलत होती पहाट

देवाजवळील दिव्यात ती
लावत होती वात 
सुखी संसाराचं स्वप्न
पाहत होती मनात

काट्याकुट्या तुडवून तीच
आटत होतं रक्त
मुलांसाठी तरी ती
उपसत होती कष्ट

अंधाराचीच जेव्हा अशी
नीशा होती दाट
आई झाली सूर्य तेव्हा
उगवली प्रकाशाची वाट.

- दीपक मधुकर बंड

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती