चविष्ट आणि खमंग बटाटा- रवा फिंगर्स

शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (12:10 IST)
दररोज संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी काय बनवावं हा मोठा प्रश्न उद्भवतो. कारण संध्याकाळी तर हलकं आणि चविष्ट असं काही लागत. जेणे करून आपली भूक पण भागेल आणि जास्त पोट देखील भरायला नको. आज आम्ही आपल्याला सांगत आहोत संध्याकाळच्या या भुकेसाठी चविष्ट आणि आरोग्यवर्धक स्नॅक्स. जे लहान मुले तर काय मोठे देखील आवडीने खातील. कारण मुलांना तर असे चमचमीत आणि काही वेगळेशे चविष्ट पदार्थ आवडतात. याला आपण टोमॅटो चटणी किंवा सॉस बरोबर देखील खाऊ शकता. चला तर मग आता आपण बटाटा रवा फिंगर्स बनविण्याची विधी जाणून घेऊया. 
 
साहित्य - 
1 कप रवा, 3 मोठे बटाटे उकडलेले, 1 कांदा, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल मिरची पूड, आलं, मीठ चवीपुरती, तेल तळण्यासाठी.
 
कृती -
एका भांड्यात रवा घेऊन त्यात पाणी घालून 1 /2 तासासाठी भिजत ठेवा. आपण बघाल की रवा घट्ट झाला आहे. आता या मध्ये बटाटा कुस्करून, कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, तिखट,मीठ, सर्व जिन्नस घालून कणके प्रमाणे मळून घ्या. 
 
पॅन मध्ये तेल टाकून तापविण्यासाठी ठेवा. आता या मळलेल्या रव्याचा कणकेचे गोळे बनवा आणि आपल्या तळहातावर घेऊन लांबोळ आकार द्या. तेल गरम झाल्यावर हे लांबोळ आकाराचे फिंगर्स तेलात सोडा आणि मध्यम आचे वर सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. तयार बटाटा रवा फिंगर्स टमाट्याची चटणी, सॉस किंवा हिरव्या चटणी सह गरमागरम सर्व्ह करा. करून बघा आपल्याला आणि आपल्या घरातील मंडळींना हे नक्कीच आवडणार.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती