बटाट्याच्या सालीचे चिप्स : बटाट्याच्या सालींपासून बनवा क्रिस्पी चिप्स, रेसिपी जाणून घ्या

बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (15:27 IST)
Potato Peel Chips : भारतीय घरांमध्ये नाश्त्यात फरसाण, बिस्कुट, आलू भुजिया, चिप्स हे घेतो. स्नॅक्स साठी आपण नेहमी चिप्स खातो. आज बटाट्याच्या सालीपासून चिप्स बनवायची रेसिपी सांगत आहोत चला तर मग रेसिपी जाणून घेऊ या.

बटाट्याच्या सालीमध्ये अनेक फायदे आहे. बटाट्याच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी, बी, आयरन ,कॆल्शिअम, पोटेशियम आणि इतर घटक आढळतात.हे ब्लडप्रेशर नियंत्रित करतात आणि त्वचा आणि हाडांसाठी चांगले असतात. आपण बटयाच्या सालींचा वापर करून चिप्स करू शकतो. साहित्य आणि कृती जाणून घ्या .
 
साहित्य-
बटाट्याची साल , ऑलिव्ह ऑइल, मीठ, लाल तिखट, जिरे पूड, 
 
कृती- 
सर्वप्रथम बटाट्याची साली एकत्र करून स्वच्छ करून घ्या. त्यावर थोडेसे  ऑलिव्ह ऑइलतेल च्या काही थेंबा घालून ओव्हन मध्ये क्रिस्पी आणि सोनेरी रंगाचे होई पर्यंत बेक करून घ्या.  नंतर त्यावर लाल तिखट, मीठ, जिरे पूड, घालून त्यात बेक केलेल्या बटाट्याची साली घाला आणि मिक्स करा. त्यावर 1 चमचा लिंबाचा रस घाला आणि हिरव्या चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह करा. 
 
 
 


Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती