Lockdown Recipes : या वेळेत मुलांना शिकवा या सोप्या 5 रेसिपी

बुधवार, 20 मे 2020 (19:12 IST)
1 व्हेज मोमोज 
साहित्य : 2 कप मैदा, 1/2 कप किसलेली कोबी, 1 /4 कप ढोबळी मिरची, 1 /2 कप किसलेला कांदा, ओवा चवीप्रमाणे, 1 चमचा तेल, मीठ चवीप्रमाणे.
कृती : सर्वप्रथम मैदा चाळून त्यामध्ये मीठ, तेल आणि ओवा घालून मठरी सारखे मळून घ्या. आता कोबी, कांदा, ढोबळी मिरचीमध्ये मीठ आणि ओवा घाला. कणकेचे लहान गोळे करून हाताने दाबून त्यात 1 चमचा सारण भरा. आता या गोळ्याच्या सगळी कडून पाकळ्या पाडून बंद करा. इडलीच्या पात्रात पाणी गरम करा आणि मोमोज ठेवून 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर वाफेत शिजवून घ्या. चटपट मोमोज तयार... गरम मोमोज चटणी सोबत सर्व्ह करावं.
 
2 चविष्ट पास्ता 
साहित्य : 250 ग्राम पास्ता, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 वाळवलेल्या लाल मिरच्या पाण्यात भिजवलेल्या, 1 चमचा तेल, 1 रसाळ लिंबू, 1 कप उकडलेल्या भाज्यांचे पाणी किंवा रस.
कृती : भाज्यांच्या पाण्यामध्ये पास्ता उकळून शिजवून घ्यावा. आता पास्त्याच्या पाण्याला वेगळे काढून एका भांड्यात ठेवा. कढईत मंद आचेवर तेल गरम करून त्यात बारीक चिरलेलं लसूण आणि लाल मिरच्या तांबूस रंग येई पर्यंत परतून घ्यावे. उकळवून ठेवलेला पास्ता घालून मिसळावे. वर ऑलिव्ह, मीठ आणि तिखट घालून सर्व्ह करावं.
 
3 उरलेल्या भाताचे खमंग भजे
साहित्य : 1 वाटी किंवा त्यापेक्षा जास्त उरलेला भात, 1 वाटी हरभरा डाळीचे पीठ, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 /4 कप गव्हाचे पीठ, 1/2 चमचा लाल तिखट, 1 /2 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1/4 चमचा हळद, मीठ चवीप्रमाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल.
कृती : सर्वप्रथम एका भांड्यात भात घ्या त्यामध्ये तेलाला वगळून सर्व साहित्ये मिसळा. गरज असल्यास पाणी घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. भाताला घोळामध्ये चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. भज्यांचं सारण तयार करा. 
 
एका कढईत तेल गरम करायला ठेवा. आता या सारणाचे लहान लहान गोळे करून तेल मध्ये सोडावं. मंद आचेवर खुसखुशीत होई पर्यंत तळून घ्या. तयार भाताच्या भज्यांना गरम चहा आणि सॉस सोबत सर्व्ह करावं.
 
4  स्पाइसी पोटेटो सँडविच 
साहित्य : 1 पॅकेट ब्रेड, 250 ग्राम बटाटे, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे, 1 चमचा बडी शेप, कोथिंबीर आणि तेल.
कृती : बटाटा सँडविच बनवणे खूप सोपे आहे. सर्वात आधी बटाटे उकळून घ्यावे. ह्यामध्ये सर्व मसाले, कांदा, हिरव्या मिरच्या मिसळावे. ब्रेडच्या स्लाइसच्या मध्ये हा मसाला भरून ग्रिल करावे. हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत स्पाइसी पोटॅटो सँडविच सर्व्ह करावे. आपण आपल्या आवडीप्रमाणे यावर चीज, मेयोनीज लावू शकता.
 
5 झणझणीत क्रंची भजे 
साहित्य : 3 मोठे बटाटे, 1/2 कप तांदळाचे पीठ, 1/2 कप हरभरा डाळीचे पीठ, 1/2 वाटी लसूण आणि शेंगदाण्याची तयार चटणी, 1 चमचा लाल तिखट, चिमूट भर हळद, चिमूटभर हिंग, तळण्यासाठी तेल, मीठ चवीप्रमाणे.
कृती : सर्वप्रथम कच्चे बटाट्यांचे साल काढून घ्या आणि पातळ चिप्स करून बाजूला ठेवा. तांदळाचे पीठ, हरभरा डाळीच्या पिठात सर्व मसाले घालून घोळ तयार करावं. लक्षात ठेवावे की घोळ जास्त पातळ नसावं. बटाट्यांच्या केलेल्या चिप्स वर दोन्ही कडून चटणी लावून दुसऱ्या चिप्स ने झाकून तयार केलेल्या घोळात बुडवून घ्या. एका कढईत तेल गरम करावयास ठेवावे. मंद आचेवर खमंग खुसखुशीत होई पर्यंत तळून घ्या. लसणाच्या चवीमध्ये बटाटा स्लाइसचे चविष्ट भजे हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती