चविष्ट आणि हेल्दी Beetroot Rice

सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (13:33 IST)
साहित्य -
1 बीट किसलेलं, 1 शिमला मिरची, 1 वाटी तांदूळ, 1 कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, मीठ, तेल, 1 चमचा गरम मसाला, तेजपान, लवंग, वेलची, काळीमिरी, वाळलेली लाल शाबूत मिरची.
 
कृती-
सर्वप्रथम एका भांड्यात तेल गरम करा त्यामध्ये लाल मिरची, काळी मिरी, वेलची, लवंग, तेज पान घाला. बारीक चिरलेला कांदा घालून तबकीरी रंग येई पर्यंत परतून घ्या. बारीक चिरलेली शिमला मिरची घालून परतून घ्या. आता कुकरमधे थोडं तेल घालून गरम करून घ्या आणि हे परतलेलं साहित्य घाला. आता किसलेलं बीट आणि उरलेली शिमला मिर्च यामध्ये मिसळून चांगल्या प्रकारे ढवळून घ्या. हे सर्व साहित्य परतून घ्या. धुवून ठेवलेले तांदूळ मिसळा. चवीपुरते मीठ किंवा सेंधव मीठ घाला. आता यामध्ये अंदाजे पाणी घालून कुकरचे झाकण लावून घ्या. आणि 1 किंवा 2 शिट्टी देऊन गॅस बंद करा. गरम हेल्दी बीट राईस खाण्यासाठी तयार वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती