Veg Recipe : हरियाली पनीर

साहित्य : 3 वाटी कोथिंबीर, 1/2 वाटी पुदिना, 1 कैरी, 1 कांदा, 2 वाटी पनीर, 1 हिरवी मिरची, 1 चमचा लसूण पाकळ्या, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा तिखट, 1 चमचा धने पूड, 1/4 चमचा हळद, 1/2 चमचा जिरे पूड, मीठ, चवीपुरतं तेल. 
कृती : मिक्समध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि 1 वाटी पाणी घालून बारीक पेस्ट बनवणे. कढईत तेल गरम करून त्यात पनीर गुलाबी रंगावर भाजून घेणे. बाजूला ठेवणे. त्याच तेलात कांदा, लसूण घालुन गुलाबी रंगावर भाजणे. त्यात कैरीचे तुकडे आणि कोथिंबीर-पुदिना-मिरची पेस्ट घालुन आटेपर्यंत शिजवणे. त्यात हळद, गरम मसाला, तिखट, जिरे आणि धने पूड घालून ढवळणे. पनीरचे तुकडे आणि मीठ घालून 2 मिनिट शिजवणे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती