Food Recipe : घरीच बनवा चविष्ट अळूच्या पानांची वडी, जाणून घ्या कृती ..

शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (09:39 IST)
साहित्य - अळूची पाने 5 ते 6 पान, हरभराडाळीचे पीठ(बेसन) 1 वाटी, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, धणे पूड, हळद, मीठ चवीपुरती, तळण्यासाठी तेल.
 
कृती -  1 वाटी हरभराडाळीचे पीठ घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, मीठ चवीपुरते, लाल तिखट, धणे पूड, हळद मिसळून घ्या. सर्व एकत्र करून ठेवून द्या.
 
आता अळूची पाने जे आपण धुऊन ठेवली आहे, त्याला तेल लावून ठेवा. आता या पेस्टला त्या पानांना लावून ठेवावं आणि पानं गुंडाळावी. उघडत आहे असे वाटल्यास त्यांना दोऱ्याच्या साहाय्याने बांधून घ्या. जेणे करून ते उघडणार नाही.
 
अळूच्या पानांची वडी बनविण्यासाठी सर्वात आधी पानांना स्वच्छ करावं. कोरोना काळात भाज्या चांगल्या प्रकारे स्वच्छ करणं फार महत्त्वाचे आहे. या साठी आपण प्रथम साध्यापाण्याने पाने धुवा, नंतर गरम पाणी करून या मध्ये मीठ घाला. मग या पानांना मिठाच्या पाण्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे धुऊन घ्या.
 
आता एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवावं त्यावर एक चाळणी ठेवा. पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर अळूची पाने चाळणी वर ठेवावं म्हणजे ती पानं चांगल्या प्रकारे वाफवून जातील.
 
वाफवून घेतल्यावर याला थंड होण्यासाठी ठेवावं व थंड झाल्यावर त्याचे काप करावे.
 
आता वेळ येते यांना खरपूस आणि खमंग तळण्याची तर गरम तेलात तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यावं . तळून झाल्यावर प्लेट मध्ये काढून सॉस सोबत सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती