पुरीचे चविष्ट भजे

शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (18:50 IST)
पुऱ्या आपण सर्व बनवितो. बऱ्याच वेळा पुऱ्या उरतात काही लोक त्या पुऱ्यांना फेकून देतात. पण आजचा लेख वाचल्यावर आपण या पुऱ्या फेकणार नाही. ही चविष्ट डिश बनवू शकता.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
 
साहित्य- 
 
10 -12 शिळ्या पुऱ्या,चवीप्रमाणे मीठ, 1/2 कप हरभरा डाळीचे पीठ, 1/2 चमचा हळद,1/2 चमचा तिखट,1 कांदा बारीक चिरलेला, 1/2 चमचा धणेपूड,1/2 चमचा वेलची पूड, 1 कप तेल .
 
कृती - 
सर्वप्रथम शिळ्या पुऱ्या लहान लहान तुकडे करून एका भांड्यात काढून बाजूला ठेवा. एका भांड्यात हरभरा डाळीचे पीठ,हळद मीठ,धणेपूड,आणि वेलची पूड घालून मिसळून घ्या.या मिश्रणात कांदा देखील बारीक चिरून घाला.लागत लागत पाणी घालून मिश्रण घोळून घ्या. या मिश्रणात पुऱ्यांचे केलेले तुकडे घालून मिसळून भजे बनवा.
कढईत तेल घालून गरम करा आणि तयार भजे सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. चविष्ट भजे सॉस किंवा हिरव्या चटणीसह सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती