वास्तू आणि वृक्ष

व्यक्तीने अनेक वर्ष केलेली ईश्वरपूजा आणि त्यापासून मिळणार्‍या पुण्यापेक्षा एका वृक्षांची लागवड केल्यानंतर मिळणारे पुण्य महान असते. कारण, एका वृक्षांपासून अनेक प्राण्यांना प्राणवायू मिळतो. वास्तूशास्‍‍त्रात देखील वृक्षांचा संबंध मनुष्‍याशी असल्याचे म्हटले आहे.

* वृक्ष लागवडीसाठी उत्तरा, स्वाती, हस्त रोहिणी आणि मूळ नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. या नक्षत्रात लावलेले रोपटे जळून जात नाही. त्याची पूर्णपणे वाढ होते.

* घराच्या नैऋत्य किंवा आग्नेय दिशेला बाग तयार करू नये. घराच्या मागील बाजूस असलेल्या आंगणात बाग करावी. घराच्या पूर्वेला मोठे वृक्ष असणे किंवा कमी असणे हे शुभ मानले जाते. त्यांना कापण्यापेक्षा त्यांच्यापासून होणार्‍या दुष्परिणामांना संतुलित करण्यासाठी घराच्या उत्तरेला आवळा, अमलताश, हरश्रृगांर, तुळशी, रानतुळस यापैकी कोणतेही एक झाड लावावे.

* ज्या झाडांना फळ येणे बंद झाले आहे किंवा कम‍ी फळे येतात त्यांना कुलथी, उडीद, मूग, तीळ आणि जवाच्या पाण्याने सिंचन करावे.

* ज्या झाडाच्या बुंध्याजवळील चारही बाजूला डुकराच्या हाडाचा एक-एक तुकडा पुरला तर ते झाड नेहमी हिरवेगार राहते. कधीच सुकत नाही क‍िंवा पानझडही होत नाही.

* घराच्या आवारात निरगुडीचे झाड असल्यास त्या घरात नेहम‍ी सुख-शांत‍ी राहते. अशा प्रकारे द्राक्षे, फणस, पाकड आणि महूआ या वृक्षांची आवारात लागवड करणे शुभ मानले जाते.

* आंब्याचे झाड लावण्याने जमीनविषयक वाद दूर होतात. मग त्या व्यक्तीने ते रोपटे कुठेही लावले तरीही चालते.

* चंद्रग्रहणापासून होणारा त्रास टाळण्यासाठ‍ी घराच्या आवारात गूलरचे झाड लावले पाहिजे.

* घराच्या पूर्वेला वड, पश्चिमेला पिंपळ, उत्तरेला पाकड किंवा दक्षिणेला गूलरचे झाड असणे शुभ मानले जाते. याशिवाय घराच्या पूर्वेला पिंपळ, दक्षिणेला पाकड, पश्चिमेला वड आणि उत्तरेला गूलरचे झाड असणे अशुभ मानले जाते.

* ज्या व्यक्तीच्या घरात बेलाचा वेल असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.

* घराच्या आवारात केळी, बोर आणि वांझ डाळींबाचे झाड असल्यास लहान मुलांना त्रास होतो.

* आवारात वाळवंटी रोपटे अशांती निर्माण करतात आणि ती संपत्तीला हानीहारक असतात. कॅक्टसचे रोपटे याच प्रकारात मोडते.

* ज्या घराच्या आवारात पळस, कंचन, अर्जून, कारंजे आणि श्र्लेषमांतक यापैकी कोणतेही एक झाड असेल तर तेथे नेहमी अशांती राहते. बोरीचे झाड अधिकाधिक शत्रूंना जन्म देते. बोरीचे झाड घराच्या आवाराच्या बाहेरच शुभ मानले जाते.

* जी व्यक्त‍ी दोन वडाच्या झाडाचे रोपण करते, ती पापांपासून मुक्त होते. वडाचे झाड नेहमी मोकळ्या जागेत लावावे.

* जी व्यक्ती पळसाचे रोपटे लावते तिला निरोगी संतान आणि सुख देणारा पुत्र प्राप्त होतो. परंतु, पळसाचे झाड आवारात नसावे.

* कोणत्याही कारणामुळे वृक्षतोड केल्यास दुसर्‍या दहा वृक्षांचे रोपण आणि पालन करणारा त्याने केलेल्या पापांपासून मुक्त होतो.

वेबदुनिया वर वाचा