एक पिरॅमिड फायदे अनेक!

सोमवार, 25 मार्च 2019 (11:21 IST)
पिरॅमिडमधून निर्माण होणारी शक्ती ही इतकी 'पॉवरफुल' असते की, त्यामुळे पिरॅमिडचा व्यवहारात अनेक प्रकारे उपयोग होत असतो. त्यामाध्यमातून अनेक लोक लाभ घेताना दिसतात. 
 
आजारारावर फायदेशीर- 
पिरॅमिडमध्ये पाणी भरून ठेवल्याने पिरॅमिडमधील चुंबकीय शक्ती त्या पाण्यात परावर्तीत होत असते. त्यामुळे पिरॅमिडमध्ये भरलेले पाणी प्याल्याने अनेक फायदे होतात. सांध्यांचे आजार, अंगदुखी, हातापायांना सूज आदी आजार बरे होतात. 
 
सुती वस्त्र पिरॅमिडमधील पाण्‍यात भिजवून दुखापत होत असलेल्या भागावर दिवसातून निदान दोन वेळा गुंडाळून ठेवावे. पिरॅमिडमध्ये दररोज पाणी भरून ठेवावे व रोज ते प्यावे. अनेक प्रकारचे त्वचेचे आजार, भाजणे आदी आजारावर पिरॅमिडमधील पाणी गुणकारी असते.
 
अल्सर, मधुमेह, अस्थमा, दमा, हृदयविकार, अर्धांगवायूआदी विकारांवरही पिरॅमिडमध्ये भरलेले पाणी फायदेशीर ठरते. शाररीक तसेच मानसिक आजारही दूर होतात. याशिवाय हे पाणी झाडांना टाकल्याने ते चांगल्या प्रकारे बहरतात. 
 
पिरॅमिड धारण केल्यानेही अनेक प्रकारचे आजार दूर होतात. धातूमध्ये प‍िरॅमिड धार्मिक स्थळी उपलब्ध असतात. तसेच लहान मोठ्या आकारात फायबरमध्ये पांढर्‍या रंगामध्ये ते उपलब्ध होतात. मोठे पिरॅमिड 20 ते 25 मिनिट डोक्यावर धारण केल्याने सर्दी, पडसे, डोकेद्वखी, दातद्वखी, लहान-सहान जखम, मुका मार, डोळ्याची जळजळ, तोंड येणे, अपचन आदी आजार तात्काळ बरे होतात. पिरॅमिडच्या वापराने वजन कमी होऊ शकते, मोडलेली हाडे लवकर जुळू शकतात, शरीराची रोग पश्च्तिकारक शक्ति वाढते. 
 
घरातील देवघरात तसेच प्रत्येक खोलीत पिरॅमिड ठेवल्याने आपापसात होणारी भांडणे थांबून घरात शांतता नांदते. लहान- लहान पिरॅमिड झोपताना बाजुला ठेवल्याने शांत झोप लागले. 
 
केसांसाठी उत्तम टॉनिक-
पिरॅमिडमधील पाणी केसांसाठी तर उत्तम टॉनिकच आहे. केसातील कोंडा दूर होणे, केसाचा काळेपणा कायम राहणे, केसांची वाढ होणे, टक्कल टाळण्यासाठी, चेहेर्‍यावरील सुरकुत्या नाहीशा होण्यासाठी, चेहरा सतेज होणे आदी गोष्टीसाठी फायदा होत असतो.
 
वास्तुदोष निवारण्यासाठी पिरॅमिड-
प्लॉट बांधकाम करण्यापूर्वी जागा शुध्द करणे आवश्यक असते. त्यासाठी प्लॉटच्या चारही कोपर्‍यात नऊ- नऊ पिरॅमिड व मध्यभागी नऊ पिरॅमिड पुरावेत. मात्र हे पिरॅमिड 9 इंच किंवा 12 इंचाचे असावेत. बांधकाम करण्यापूर्वी जमिनीत पिरॅमिड पुरल्याने जागा दोषमुक्तीहोऊन शुध्द होते. अशा जागेवर घर बांधल्याने ते वास्तुदोष रहीत असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती