मानसिक ताण दूर करेल हा वास्तू उपाय

जर आपल्याला लहान-लहान गोष्टींवर ताण येत असेल आणि डॉक्टरांचा सल्ला ही फेल होत असेल तर आपल्याला एकदा तरी वास्तू टिप्स अमलात आणले पाहिजे. वास्तूप्रमाणे दिवसातून एकदा चांदीच्या ग्लासात पाणी पिण्याने रागावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. याव्यतिरिक्त आणखी काही वास्तू टिप्स आहेत ज्याने मा‍नसिक ताण कमी होण्यात मदत मिळते.
* जर घरात नकारात्मक ऊर्जेचा आभास होत असेल तर घरात संध्याकाळी सुवासिक आणि पवित्र धूर करावा. ज्याने वातावरण सकारात्मक राहील.
 
* काही लोकं बेडरूममध्ये अल्कोहलचे सेवन करतात अशाने ताण वाढतं. बेडरूममध्ये अल्कोहलचे सेवन केल्याने धडकी भरवणारे स्वप्न येतात. आणि यामुळे आजारी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
 
* घरात कोळीचे जाळ असल्यास मानसिक ताण वाढतो. अर्थात घरात स्वच्छता केली पाहिजे.
 
* सोफा सेटच्या कव्हरचा रंग हलका निळा किंवा आकाशी असल्यास मानसिक शांती लाभते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती