वास्तूप्रमाणे बेडरूममध्ये भांडू नये

बेडरूमची सजावटीचा पती-पत्नींच्या नात्यावर खूप प्रभाव पडतो. म्हणून मधुर संबंधांसाठी बेडरूमच्या वास्तूकडे दुर्लक्ष करता कामा नये. बघू काही वास्तू टिप्स:
* बेडरूम कोणत्याही प्रकाराची चर्चा किंवा वाद घालण्यासाठी नसतं. बेडरूम केवळ आराम करण्यासाठी व आपल्या पार्टनरसोबत क्वालिटी वेळ घालवण्यासाठी असतं. म्हणून येथे प्रेमाव्यतिरिक्त काहीच करणे योग्य नाही.
* बेडरूम दक्षिण- पश्चिम दिशेत असावे आणि याच कोपर्‍यात बेडही असावे.
* बेडरूमच्या भिंती तुटक्या फुटक्या नसाव्या.
* घराच्या मालकाचा बेडरूम उत्तर-पश्चिम दिशेकडे नसावा.
* बेडरूममध्ये हिंसक फोटो लावू नये.
* बेडरूमच्या भीतींचा रंग हलका असावा.
* बेडला चिकटलेल्या भिंतींवर घडी, फोटो फ्रेम लावू नये.
* बेडच्या समोरच्या भिंतींवरही काहीही लावणे टाळावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती