देवघराच्या संदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या

गुरूवार, 13 जून 2019 (16:22 IST)
एकाच देवतेच्या दोन मुर्ती देवघरात ठेवू नये. 
भंगलेल्या किंवा जीर्ण झालेल्या मुर्ती अ‍थवा फोटो ह्यांचे विसर्जन करा. 
एखादा नवस बोलून किंवा अडलेले कामे होण्यांसाठी एखादा संकल्प करून देवघराची स्थापना करू नका. 
देवघराच्या बाजुला शौचालय किंवा अडगळीची खोली असु नये. 
देवघराला कळस बसवू नका कळस फक्त मंदिरातच बसविले जाते.
दत्तक घेतलेल्या घराचे किंवा वंश पीडीत पूर्वज घराण्याचे देव पुजेत नसावे. 
संसारी माणसांनी देवघरात मारूतीचे पूजन करू नये कारण मारूती हा बालब्रह्मचारी आहे. ह्यांमुळे वंश खंडीत होण्याची शक्यता असते. 
शनिची किंवा शनियंत्राची पूजा देवघरात करू नये त्यामुळे जीवन संकटमय होते. 
पूर्वजांचे टांक करून देवघरात ठेवू नका अथवा मुंजाची पूजा देवघरात करू नका. 
पाहुणे म्हणून आलेल्या देवतांची पूजा करावी त्यांना इतर पूजेसारखाच मान द्याव पण त्याच बरोबर आपले कुलदैवत कुल स्वामीनी ह्यांचा विसर पडू देवू नका. घरातील कुळ कुळाचार नित्य नेमाने करा. 
 
ह्या गोष्टी जर आपण नित्य नियमाने केल्या तर आपणाला निश्चितपणे घरात सौख्य लाभेल आणि आपली अडलेली कामे पूर्ण होतील ही खात्री बाळगा. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती