पर्समध्ये पैसे टिकत नसतील तर करा हे सोपे उपाय

शुक्रवार, 29 मार्च 2019 (15:07 IST)
पर्स अशी वस्तू आहे ज्याला तुम्ही घराबाहेर पडताना कधीच विसरत नाही. पर्समध्ये लोक सर्व गरजा असणार्‍या वस्तू ठेवतात. मग एटिएम कार्ड असो किंवा तुमचे ड्राइविंग लाइसेंस. रुपये असो किंवा तुमच्याशी निगडित कोणती महत्त्वपूर्ण वस्तू. तुमचा पर्स तुमच्यासाठी फारच महत्त्वाची वस्तू आहे.
 
बर्‍याच लोकांचे मानणे आहे की पर्समध्ये पैसे टिकत नाही. जर तुम्ही वास्तूनुसार आपल्या पर्सला ठेवले तर नेहमीच तुमच्या पर्समध्ये बरकत राहील.
 
आपल्या बटुआत किंवा पर्समध्ये खाण्याच्या वस्तू ठेवू नये. पर्समध्ये खाण्याच्या वस्तू ठेवल्यातर पैसे टिकत नाही. आपल्या पर्समध्ये पवित्र आणि धार्मिक वस्तूंना जरूर ठेवा. तुम्ही रुद्राक्ष देखील आपल्या पर्समध्ये ठेवू शकता. हे तुम्हाला बरकत देईल.
 
तुम्हाला हा उपाय थोडा विचित्र वाटेल पण हा फारच कारगर आहे. तुम्हाला तुमच्या पर्समध्ये बिलकुल थोडेसे गायीचे शेण (गोबरं) ठेवायला पाहिजे. हा उपायाला केल्याने पर्समध्ये नेहमी लक्ष्मीची कृपा राहते आणि तुम्ही वायफळ खर्च देखील करत नाही.
 
वास्तूनुसार तुम्ही तुमच्या पर्समध्ये लक्ष्मीचा फोटो नक्की ठेवा. असे केल्याने तुमच्या पर्समध्ये सदैव पैसे राहतात. तो कधीही रिकामा राहणार नाही. जर तुम्ही जास्त खर्च करत असाल तर आपल्या पर्समध्ये चिमूटभर तांदूळ ठेवा. असे केल्यानं तुमचे पैसे लवकर खर्च होणार नाही.
 
असे मानले जाते की जर तुमची कोणती मनोकामना असेल तर त्याला एका कागदावर लिहा आणि लाल रंगाच्या लिफाफेत बंद करून आपल्या पर्समध्ये ठेवा. तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती