घरात असायला पाहिजे खिडक्या, याने बाहेर निघते निगेटिव्ह एनर्जी आणि घरात येते पॉझिटिव्ह एनर्जी

बुधवार, 9 जानेवारी 2019 (11:25 IST)
वास्तू शास्त्रानुसार, घरात खिडक्या असणे फारच आवश्यक आहे. खिडक्यांमुळे निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करते. खिडक्यांमुळे घराची सुंदरता वाढते. वार आणि सूर्याचा प्रकाश देखील खिडक्यांच्या माध्यमाने खोलीत येतो. घरात खिडक्या बनवताना काही वास्तू नियमांकडे लक्ष्य ठेवायला पाहिजे, जे या प्रकारे आहे -
 
1. खिडक्या उघडता आणि बंद करताना आवाज नाही व्हायला पाहिजे. याचा प्रभाव घराच्या सुख-शांतीवर पडतो. यामुळे परिवाराच्या सदस्यांचे मन विचलित होतात.  
 
2. घरात खिडक्यांची संख्या सम असायला पाहिजे, जसे 2, 4 किंवा 6.   
 
3. खिडकीचा आकार भिंतीच्या अनुपातात असायला पाहिजे, न जास्त मोठी न लहान.  
 
4. खोलीच्या एका भिंतीवर एकापेक्षा जास्त खिडक्या नको.  
 
5. शक्य असल्यास घराच्या पूर्व दिशेकडे खिडकी असणे गरजेचे आहे. रोज सकाळी सूर्याची किरण सरळ खोलीत यायला पाहिजे.  
 
6. जर पूर्व दिशेत खिडकी बनवणे शक्य नसेल तर रोशनदान देखील बनवू शकता.  
 
7. वेळो वेळी खिडक्यांची मरम्मत आणि रंग-रोगानं नक्की करायला पाहिजे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती