नवं दांपत्याचे शयनकक्ष कसे असावे

मंगळवार, 31 डिसेंबर 2019 (14:23 IST)
घरात शयनकक्षाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. बऱ्याच वेळा असे दिसून येते की घरात अनेक वस्तूंच्या कमतरता असून वैवाहिक जीवन उत्तम असतात. तर काही घरां मध्ये सगळं असून असंतोषी वातावरण असते. नवं दांपत्यासाठी सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी त्यांचे शयनकक्ष योग्य ठिकाणी, योग्य दिशेस असणे महत्त्वाचे असते. त्याच बरोबर रंग संरचना, आरसे, शौचालय, फर्निचर,पण योग्य स्थळी असणे महत्त्वाचे असते. 
 
नवं दांपत्यासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी उपयोगी टिप्स                                     
 
या गोष्टी लक्षात ठेवा.
 
नवं दांपत्यांनी ईशान्य दिशेच्या खोलीचा झोपण्यासाठी वापर करू नये.
वास्तू विज्ञानानुसार ईशान्य दिशा ही गुरुची असल्यामुळे वैवाहिक जीवनात नीरसता येते. 
लैंगिक संबंधांमध्ये उत्साहाचा अभाव जाणवतो. एकमेकांमध्ये समन्वयाचा अभाव होतो. 
 
काही गोष्टींचे पालन केल्याने आपले दांपत्यजीवन सुरळीत चालू शकते.
 
*  दांपत्याच्या शयनकक्ष मध्ये आरसा असू नये. असल्यास झोपण्याचा वेळीस ते झाकून ठेवणे. 
 
*  शयनकक्षात फर्निचर लोखंडी कमानीदार, चंद्रकोर, किंव्हा गोलाकार असू नये. अन्यथा घरातील सदस्यांच्या आरोग्यांवर त्याचे अशुभ परिणाम पडतात. आयताकृती,चौरस लाकडी फर्निचर वास्तुशास्त्रात शुभ मानले आहे.
 
*   शयनकक्षात प्रकाश संरचना तीव्र नसावी.शक्यतो पलंगावर थेट प्रकाश नसावा.प्रकाश नेहमी मागील किंव्हा डाव्या बाजूस असावा.
 
* शयनकक्षाच्या दारा जवळ पलंग नसावा. असे असल्यास घरात अशांतीची स्थिती निर्माण होऊ शकते. 
 
* दक्षिण आणि उत्तर दिशेस पाय करून झोपणे कधी ही चांगले.
 
* स्नानगृह शयनकक्षात असल्यास त्याचं दर सतत बंद ठेवावे. अन्यथा नकारात्मक उर्जे चा संचार होतो.
 
*  पलंगाच्या खाली कचरा किंव्हा अडगळीचे चे सामान ठेवू नये.
 
* भिंतीचा रंग पांढरा किंव्हा लाल असू नये. हिरवा, गुलाबी, किंव्हा आकाशी रंग असावा . ज्या मुळे खोलीत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
  परस्पर मतभेद कमी  होतात. ह्या रंगाचे पडदे किंव्हा बेडशीट देखील वापरता येऊ शकते.
 
.* दांपत्याचे फोटो किंव्हा राधा कृष्णाची तसबीर लावल्याने आपसात परस्पर प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वाढतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती