वास्तू दोष दूर होतील तेही तोड-फोड न करता

सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (08:59 IST)
वास्तुनुसार प्रत्येक दिशांचे देव असतात. म्हणून प्रत्येक दिशेला आप आपले महत्व आहे. घरात किंवा कार्यालयाच्या कोणत्याही दिशेला काही दोष असल्यानं जीवनात आणि कार्यक्षेत्रात अडचणींना सामोरी जावं लागत. म्हणून घराचे बांधकाम करताना वास्तूची काळजी घेणं महत्वाचं असत. वास्तुशास्त्रात सर्वकाही बांधकाम करण्यासाठी योग्य दिशा आणि स्थळ बद्दल सांगितलेले आहे. तरीही कधी कधी आपण या वास्तूकडे लक्षच देत नसतो ज्यामुळे जीवनात समस्या कायम राहतात. 
 
जर आपल्या घरात देखील वस्तू दोष आहे तर काही सोपे उपाय करून आपण या दोषांना दूर करू शकता. जेणे करून आपल्या कौटुंबिक जीवनात आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणींना दूर करू शकता.
 
* प्रत्येक जण घराच्या मुख्य दारातून ये - जा करतात, हेच ते ठिकाण आहे ज्यामधून आपल्या घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यासाठी हे ठिकाण वास्तुदोषरहित असणं फार महत्वाचं असत. जर आपल्या घराच्या मुख्यदारामध्ये काही वास्तू दोष असल्यास दाराच्या उंबऱ्याला लाकडाने बनवावं. मुख्यदारावर कुंकुने स्वस्तिक बनवावं. स्वस्तिक हे शुभ मानलं जातं. घराच्या मुख्यदारावर दररोज संध्याकाळी दिवा लावावा.
 
* जर आपल्या घरात काही वास्तुदोष आहे ज्यामुळे घरात आपल्याला अडचणी आणि त्रास होत आहे परंतु त्या ठिकाणी पुनर्बांधणी करण शक्य नाही तर घरातील दक्षिण- पूर्व दिशेस मातीच्या भांड्यात किंवा माठात पाणी भरून ठेवावं. या मुळे वास्तू दोष दूर होतो.
 
* वास्तुनुसार घरात तुटक्या वस्तू ठेवल्यानं देखील वास्तुदोष लागतो. म्हणून तुटलेल्या किंवा खराब वस्तू जसे की बंद घड्याळ किंवा कोणते इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी त्वरित घरातून बाहेर काढून द्या. तुटक्या वस्तू घरात ठेवल्यानं घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्याच प्रमाणे आपल्या घराच्या गच्ची वर देखील अडगळ किंवा घाण साचवू नका.
 
* जर आपल्या घरात कोणत्याही गोष्टी शिवाय तणाव होत किंवा घरात मतभेदाची स्थिती उद्भवते तर याचा मागील कारण म्हणजे वास्तुदोषच होय, घराच्या मुख्यदारावर सूर्यफुलाच्या झाडाचं चित्र लावावं. या मुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होत.
 
* उत्तर-पश्चिम दक्षिण, आणि उत्तर पश्चिम दिशेच्या मध्यभागी वायव्य कोण म्हणतात. या दिशेचे मुख्य वायू घटक आहे. वास्तुनुसार या दिशेला संध्याकाळी दिवे लावावे. या दिशेला अंधार असल्यास नकारात्मकता वाढते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती