मुलांना घरी एकटं सोडताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी

मंगळवार, 9 जुलै 2019 (11:04 IST)
नोकरी आणि व्यवसायानिमित्त अनेकांना त्यांच्या लहान मुलांना घरी एकटं सोडून जावं लागतं. मुलांना घरी एकटं सोडताना पालकांनी कोणती काळजी घ्यायला हवी हे तुम्हाला सांगण्यात येत आहोत. 
 
1. घरातील सदस्यांचे मोबाइल नंबर मुलांकडून वदवून घ्या. इमर्जन्सी असेल तेव्हा त्याचा कसा उपयोग करायचा हे त्यांना सांगा. 
 
2.  धारदार आणि टोकदार वस्तुसुद्धा त्यांच्या हातात लागणार नाहीत अशी काळजी घ्या. 
 
3. मुलांना थोडावेळ एकटं सोडताना स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडरचे नॉब तपासून घ्या. 
 
4. विजेचा बोर्ड, मोबाइल चार्जर अशा अनेक गोष्टींपासून ते दूर राहतील याची काळजी घ्या. 
 
5. अनेक मुलं एकटं राहायला घाबरतात. त्यांची एकटेपणाची भीती कमी करण्यासाठी त्यांची मदत करा. 
 
6. घरात पाळीव प्राणी असेल तर त्यांच्यापासून मुलांना दूर ठेवा. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती