बीन बॅग खरेदी करताना...

शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (13:41 IST)
बीन बॅग आज घरातली एक वस्तू नसून स्टाईल स्टेटमेंट बनली आहे. तुम्हीही बीन बॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही टिप्स लक्षात ठेवा.
* बीन बॅग घेण्यापूर्वी ती कोणासाठी घेणार आहात ते ठरवा. कारण लहान मुलं, युवा आणि वयस्कर व्यक्ती यांच्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनच्या बीन बॅग बाजारात उपलब्ध आहेत.
* बीन बॅग घरात कुठे ठेवणार याचा अंदाज घ्या. त्यावरून तुम्हाला कोणत्या साईजची बीन बॅग खरेदी करायची याचा अंदाज येईल.
* लहान मुलांसाठी बीन बॅग घेत असाल तर एक्स्ट्रा स्मॉल साईज घेऊ नका. मुलं मोठी झाली की ही बॅग वापरण्यायोग्य राहणार नाही. ती वापरातून बाद करावी लागेल.
* बीन बॅग घेताना फिलींग क्षमता तपासून घ्या. बीन बॅगचं फिलींग करताना किती खर्च येईल याची चौकशी करा. थर्माकोल बॉलच्या वाढत्या किमतीचा विचार करा.
* बीन बॅग घेण्यापूर्वी मटेरिअल वॉशेबल असल्याची खात्री करून घ्या. घरातील प्रत्येकजण बीन बॅगचा वापर करत असेल तर त्यावर भरपूर डाग पडत असतात. शिवाय धूळ बसून ती खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच बीन बॅनचा रंग गडद असावा. हलक्या रंगाची बीन बॅग लवकर मळकट दिसत. 
* बीन बॅग घेताना शिलाईकडे खास लक्ष देण्याची गरज आहे. थोड्या वापरानेही बॅगची शिलाई उसवण्याची शक्यता असते. अशा वेळी दुहेरी शिलाईची बीन बॅग खरेदी करणं श्रेयस्कर ठरतं.
* बीन बॅगचं फॅब्रिक हीदेखील लक्षात घेण्याजोगी बाब असते. सध्या कॉटन, डेनिम आणि फॅब्रिकची बीन बॅग ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे आपल्या इंटेरिअरला साजेशी बीन बॅग घ्या आणि खोलीचा लूक खुलवा.
 
प्राजक्ता जोरी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती