ऑनलाईन मागवलेली बॅग ब्रँडेड आहे की फेक कसं शोधावं

शनिवार, 30 जानेवारी 2021 (17:10 IST)
कोणतीही ब्रँडेड वस्तू ऑनलाईन खरेदी करताना कधी तरी संशय येतोच की मागविलेली वस्तू खरी आणि योग्य आहे का.खरं तर ऑनलाईन वस्तूंवर खूप डिस्काउंट किंवा सवलत दिली जाते या मुळे ब्रँडेड वस्तू स्वस्तात मिळतात.बऱ्याच वेळा आपल्याला हा सौदा फारच चांगला झाला असं दिसून येत. परंतु बऱ्याच वेळा सवलतीच्या ऐवजी फेक आणि बनावटी उत्पादन पाठविले जाते.
 
सहसा हे हॅन्डबॅग आणि पर्सच्या बाबतीत होत आणि हे हमखास होतच या सर्व ब्रँडेड उत्पादनांमध्ये मिळालेली सूट दिल्यावर देखील हे उत्पादन खूप महाग असतात. त्यामुळे आपल्याला दिलेली वस्तू खरी आहे की बनावटी हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते जाणून घेऊ या.
 
1 लोगो तपासा
आपल्या कडे बॅग किंवा पर्स आल्यावर लक्ष ठेवा की हॅन्डबॅगच्या डिझाइनसह त्याचा लोगो देखील खरा असावा. बऱ्याचदा ब्रँडेड उत्पादनाची प्रथम प्रत मूळ म्हणून विकली जाते.अशा परिस्थितीत आपल्यासह फसवणूक होऊ शकते.एखाद्या बनावटी उत्पादनाचा लोगो खऱ्या लोगोपेक्षा वेगळा असेल. तर त्या दोन्ही लोगोची काळजीपूर्वक तपासणी करा. ब्रँडचे नाव देखील काळजीपूर्वक तपासा. बनावटी लोगो मध्ये फॉन्ट,रंग, डिझाइन किंवा स्पेलिंग चुकीची असते.
 
2 डिटेल्सची काळजी घ्या -
कोणत्याही ब्रँडेड वस्तूला खरेदी करताना हे बघितले जाते की आपण खरेदी केलेली वस्तू परिपूर्ण आहे. कोणत्याही मोठ्या कंपनी च्या उत्पादनांमध्ये त्यांच्या वस्तूची फिनिशिंग चांगली असते. ते आपले उत्पादने असेच विकत नाही. चांगली गुणवत्ता असणे ही त्यांची ओळख आहे.त्या उत्पादनाच्या गुणवत्ते ची तपासणी पूर्वीच झालेली असते.जर आपण ऑनलाईन मागविलेल्या बॅग चे किंवा पर्सचे धागे-दोरे निघत असतील, बेल्ट्स नीट लावलेले नसतील किंवा फिनिशिंग मध्ये कमतरता आहे तर ते उत्पादन बनावटी असू शकत.
 
3 बटण,झिपर, क्लास्प तपासून बघा -
आपल्या कडे बॅग आल्यावर त्यामधील लागलेल्या धातूंचा रंग आणि गुणवत्तेला तपासून घ्या की चांगले आहे किंवा नाही. त्याचा रंग फिकट तर झाला नाही किंवा एखादे धातूचे दोष तर नाही. कोणत्याही ब्रँडेड बॅगमध्ये अशा प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग दोष असण्याची शक्यता नसते. आपल्याला ही काळजी घ्यावयाची आहे की आपण ऑनलाईन मागविलेल्या महागड्या बॅग किंवा पर्स चांगल्या गुणवत्तेच्या असावा.
 
4  पर्सचे मटेरियल तपासा- 
जेवढे देखील प्रसिद्ध ब्रँड आहे ते कधी ही रफ साहित्य किंवा मटेरियल वापरत नाही. आपण कोणत्याही चांगल्या ब्रँडचे बॅग किंवा पर्स घ्याल त्याचे मटेरियल स्वस्त आणि फेक हॅन्डबॅग्स पेक्षा अधिक चांगली असेल. बऱ्याच बॅग्स बघून आपण ही ओळखू शकता की ते खरे आहे की बनावटी.
 
5 पॅकेजिंग -
हे लक्षात ठेवा की एका ब्रँडेड बॅगेची पॅकेजिंग देखील ब्रँडेड असेल. त्या वस्तूंची पॅकेजिंग खूप चांगली असते आणि ते सहजपणे ओळखले जाऊ  शकतात.जर आपण एखाद्या चांगल्या ब्रँडचे बॅग घेत आहात तर ते वेगळ्या पॅकेजिंग मध्ये येईल. 
 
अशा प्रकारे आपण कोणतेही नवीन हॅन्ड बॅग किंवा पर्स खरेदी करताना हॅन्डबॅगची गुणवत्ता तपासून बघा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती