फर्निचर वरील तेलाचे डाग काढण्यासाठी हे हॅक्स अवलंबवा.

बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (18:48 IST)
कोणत्याही वस्तूंवर डाग लागण्याचा अर्थ आहे की त्या वस्तुचे रूप बिघडणे. मग ते भिंत असो, कापड असो किंवा फर्निचर असो. ह्या गोष्टींवर डाग लागले असेल तर त्या वस्तूंना बाजूला काढून ठेवावं असं वाटते. परंतु त्यावरील डाग काढल्यावर पुन्हा ती वस्तू चकचकीत होते. नेहमी ड्रेसिंग टेबल लाकडी रॅक खुर्ची वर तेलाचे डाग लागतात, ज्यामुळे फर्निचर घाण दिसते.जर आपण फर्निचरचे सौंदर्य तसेच ठेवू इच्छिता तर या सोप्या टिप्स अवलंबवा.
 
1 व्हिनेगर आणि ऑलिव्ह तेल- 
व्हिनेगर एक आश्चर्यकारक वस्तू आहे. ह्याच्या साहाय्याने तर हट्टी डाग देखील सहज निघतात. ह्याचा वापर करून आपण फर्निचर वरील तेलाचे डाग सहजरीत्या काढू शकता. या साठी  आपण एका भांडत्यात ऑलिव्ह तेल आणि व्हिनेगर चांगल्या प्रकारे मिसळून तयार करा. आता या मिश्रणाला डाग लागलेल्या जागी टाकून तसेच ठेवा नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. आता आपण बघाल की फर्निचर वरील डाग नाहीसे झाले आहे. 
 
2 मीठ- 
मीठ देखील अशी गोष्ट आहे, जे स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक आहे. अन्नाची चव वाढविण्यापासून  इतर घरगुती काम सोपे करण्यासाठी मीठ वापरले जाते. फर्निचर वरील डाग काढण्यासाठी ह्याचा वापर करतात.या साठी आपण मीठ,पाणी आणि लिंबाच्या रसाच्या काही थेंबा घालून एक घोळ तयार करा आणि डाग लागलेल्या जागी स्प्रे करून स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. फर्निचर चकचकीत होईल.
 
3 बेकिंग सोडा- 
कोणत्याही फर्निचर वरील तेलाचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा वापरू शकता. या साठी  डाग लागलेल्या जागी बेकिंग सोडा घालून काही वेळ तसेच ठेवा 15 मिनिटा नंतर एका स्वच्छ कपड्याने किंवा मऊ ब्रशने हळुवार घासा या मुळे डाग सहजपणे निघतो.
 
4 टूथपेस्ट वापरा-
तेलाचे डाग काढण्यासाठी आपण टूथपेस्टचा वापर देखील करू शकता. या साठी  डाग लागलेल्या जागी टूथपेस्ट लावून काही वेळा नंतर हळुवार हाताने चोळा. काही वेळातच आपल्याला फर्निचर वरील डाग पुसट होताना दिसतील. या शिवाय आपण टूथपेस्ट आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण तयार करून देखील तेलाचे डाग काढण्यासाठी वापरू शकता.
 
डाग काढल्यावर फर्निचर काही वेळ उन्हात ठेवा. नंतर आपण ह्यावर पॉलिश करू शकता. जर असं करणे शक्य नाही तर आपण एखाद्या पेट्रोलियम जैली ने देखील एक किंवा दोन वेळा पॉलिश करू शकता. या मुळे देखील फर्निचर चकचकीत होईल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती