Cleaning Tips: रूम हीटरची धूळ आणि घाण अशा पद्धतीने स्वच्छ करा

शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (16:19 IST)
जवळपास प्रत्येकाच्या घरात एसी, उन्हाळ्यात कूलर आणि हिवाळ्यात रूम हिटर असतो. हिवाळ्याच्या मोसमात, खेड्यातील लोक शेकोटी किंवा आग पेटवून  थंडी दूर करतात, परंतु शहरांमध्ये आग लावणे शक्य नसते, म्हणून बहुतेक शहरांमध्ये लोक रूम हिटर किंवा ब्लोअर लावतात. जेव्हा हिवाळा वाढतो तेव्हा घरातील रूम हीटर चालू केल्याने खोली गरम होते आणि थंडी पासून बचाव होतो. 
 
रूम हीटर आणि ब्लोअर चांगली गरम हवा निर्माण करतात, परंतु धूळ आणि घाण त्याच्या फिल्टर, पंखा आणि शरीरात जमा होते. बरेच लोक ब्लोअर किंवा हीटर खराब होऊ नये म्हणून ते साफ करणे टाळतात, घरात असलेले रूम हिटर आणि ब्लोअर अशा पद्धतीने स्वच्छ करा. या टिप्स जाणून घ्या.
 
स्वच्छता करण्यापूर्वी हे काम करा-
रूम हीटर आणि ब्लोअर साफ करण्यापूर्वी, प्लग काढून टाका जेणेकरून विजेचा धक्का बसण्याची भीती राहणार नाही.
प्लग काढा आणि बाजूला ठेवा आणि त्यात पाणी पडणार नाही अशी काळजी घ्या.
रूम हीटर स्वच्छ करण्यासाठी खूप कमी प्रमाणात पाणी वापरा.
पाण्याऐवजी ओले वाइप्स वापरता येतात .
 
रूम हीटर स्वच्छ करण्यासाठी साहित्य
स्क्रबर
हेअर ड्रायर
वेट वाईप्स 
डिटर्जंट द्रव
स्क्रबर
टिशू पेपर 
 
रूम हीटर कसे स्वच्छ करावे-
हीटर साफ करण्यासाठी, सर्वप्रथम वरच्या आणि आतील भागांवर हेअर ड्रायर चालवा जेणेकरून जमा झालेली धूळ आणि घाण निघून जाईल.
तुम्ही कपड्याने धूळ टाकून देखील धूळ साफ करू शकता, याशिवाय, ओल्या वाइप्सने सर्व भाग पूर्णपणे स्वच्छ करा.
ओल्या वाइप्सने पुसल्यानंतरही घाण साचून राहिल्यास स्क्रबरमध्ये काही डिटर्जंट टाकून घाण आणि धूळ असलेल्या भागावर लावा.
स्क्रबरने धूळ आणि घाण पुसून टाका आणि नंतर ओल्या वाइप्सच्या मदतीने घाण पुसण्यास सुरुवात करा.
घाण नीट पुसून  झाल्यावर ओल्या वाईप्स ने पुसून टाका म्हणजे घाण साचून राहणार नाही.
कोरड्या सुती कापडाने पुसल्यानंतर, हेअर ड्रायर चालवून पाणी किंवा ओलावा काढून टाका जेणेकरून कोणतीही घाण किंवा पाणी राहणार नाही.
तुमचा हिटर किंवा ब्लोअर  साफ झाला आहे, साफ केल्यानंतर लगेच हीटर चालू करू नका, काही वेळानंतरच हीटर चालू करा.

Edited By- Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती