साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना 'जनस्थान' पुरस्कार

बुधवार, 30 जानेवारी 2019 (09:32 IST)
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा प्रतिष्ठेचा 'जनस्थान' पुरस्कार ज्येष्ठ कवी, साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना जाहीर झाला आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी येत्या 27 फेब्रुवारी रोजी पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. 1 लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून सन 1991 पासून दर वर्षाआड मराठी साहित्यात विशेष कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकाला हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी 6 वाजता पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती