शब्दाचे सामर्थ्य

सोमवार, 27 एप्रिल 2020 (18:32 IST)
शब्दाशब्दांतुनी वाहावे, जीवनाचे श्वास
शब्दाशब्दातून करावा, जीवनाचा ध्यास

शब्दाचे न व्हावे, अर्थाचे अनर्थ
शब्दातून न व्हावा, जीवनी संघर्ष

शब्द असावे मृदुल, अन कोमल
शब्दातून निघावे, गीत सुरेल

शब्दाचे निघावे, संयमाने बाण
शब्दाने न व्हावे, मन घायाळ

शब्दातूनी न घडावा, वाद विवाद
शब्दांनी करावा, सहज संवाद 

शब्दातून घडावे, निर्सगाचे सोंदर्य
शब्दातून दिसावी, प्रतिभा अन औदार्य

शब्दांनी कवटाळावे, विश्व् मिठीत
शब्दांनी करावे आयुष्याचे, सुलभ गणित

शब्दात सामावे सूर्य, चंद्र, तारे
शब्दातूनि सुटावे, कवितेचे वारे

शब्दांनी सामावून घ्यावे, सारे आयुष्य
शब्दातून घडावा, यशस्वी मनुष्य
लक्ष्मीधर गावपांडे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती