मुली भोवतीच जग सारे फिरे..

रविवार, 27 सप्टेंबर 2020 (23:27 IST)
मुली भोवतीच जग सारे फिरे,
गर्भात असल्या पासून तेच विश्व सारे,
कोणताच दिवस तिच्या वाचून नाही,
मुली वाचून दुसरे काही सुचतं ही तर नाही,
मग एक खास दिवस कशाला हवा मुलीसाठी,
अवघ आयुष्यच तर आहे की तिच्यासाठी!
क्षणो क्षणी तिच्याच साठी मन झुरत,
एकच दिवस कसा काय बा त्यासाठी पुरतो?
माझी छकुली नेहमी खास आहे माझ्याकरता,
खास दिवसाची वाट, का बघू त्याकरता?
.......अश्विनी थत्ते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती