लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीच्या मनात असतं असं काही, नवरदेव कधीच करत नाही पूर्ण

लग्न म्हटलं तर मुलींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात कारण तिला आपलं घर सोडून दुसर्‍या कोणाच्या घरी त्याच्या कुटुंबासोबत जुळवून घ्यायचं असतं. लहानपणापासून दुसर्‍याच्या घरी जायचे आहे हे ऐकत त्या  हिशोबाने वेगवेगळे स्वप्न रंगवत मुली मोठ्या होतात आणि लग्नानंतर पहिल्या रात्री काय घडेल हा विचार तर त्यांच्या मनात सतत सुरूच असतो. पहिल्या रात्रीबद्दल मुलींच्या मनात काय सुरू असतं, त्या रात्रीबद्दल त्यांच्या काय  अपेक्षा असतात हे जाणून घेणे देखील आवश्यक आहे कारण अनेकदा मुलांना हे कळतच नाही की त्यांना नेमकं करायचं तरी काय आहे आणि नवीन घरात, नवीन वातावरणात मुली स्वत:ला काय हवं हे सांगत देखील नाही. म्हणून  जाणून घ्या काय अपेक्षा असतात मुलींच्या.
 
मुलींची इच्छा असते की सर्वात आधी तर मुलाने प्रेमाने तिच्याशी गप्पा मारव्या. तिचा हात आपल्या हातात घेऊन भावना शेअर कराव्या. एकमेकांना एकमेकांबद्दल काय आवडतं हे सांगावं. आवड-निवड सांगाव्या. आणि शेवटी ही जाणीव करून द्यावी की प्रत्येक पावलावर तो तिच्या साथ देईल.
 
अनेक मुली लग्नाच्या धावपळीत व्यवस्थित आहार घेऊ पात नाही. अशात तिच्यासाठी काही लाइट फूड किंवा ज्यूस, शेक, ड्राय फ्रूट्स अरेंज केल्यास तिला निश्चित आनंद होईल आणि नवरा पुढे देखील तिची काळजी घेईल हे कळून येईल.
 
मुलींना फर्स्ट नाइट नेहमी लक्षात राहावी असं वाटतं असतं. याला मेमोरेबल करण्यासाठी फोटोहून अधिक स्पेशल काय असू शकतं. सेल्फी, कँडिड फोटो उत्तम पर्याय ठरेल.
 
मुलींना गिफ्ट्स, फुलं यांची खूप आवड असते. म्हणून पहिल्या रात्री तिला गिफ्ट मिळालं तर ती फार खूश होईल आणि नेहमी ते गिफ्ट आवरून ठेवेल. 
 
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या मनाची तयारी असल्यावरच पुढे वाढावे तरच आपली पहिली रात्र मेमोरेबल राहील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती